जीव घुसमटला कि अस वाटत कि कोकणातल्या एखाद्या निर्मनुष्य किनाऱ्यावर अमावास्येच्या रात्री जाऊन जोरात किंचाळावे. इतक्या जोरात बेंबीच्या देठापासून ओरडावे, कि खोल समुद्रात, अमावास्येच्या अंधारात एकांकी पोहणाऱ्या मास्याला हाक ऐकू जावी.

एकटा त्याचा जीव, एकटा माझा जीव.
अंधार आणि घोंघावता वारा.
उसळत्या लाटा आणि माझी कर्कश किंचाळी.


त्याला पण कधीकधी वाटत असेल कि कोणाशी तरी बोलाव, त्याच्या अंधारमय हताश आयुष्यातल्या गोष्टी कोणाला तरी सांगाव्यात, कोणीतरी त्याच्यासाठी कान बनाव.

माझ ओरडून झाल कि मी शांत राहेन त्याच्यासाठी, त्याच्या व्यथा ऐकेन. तो गोल गोल फिरत राहील आणि बोलत राहील. बोलून झाल्यावर विचार करेल कि हा कोण मुलगा आहे आणि माझ्या आयुष्यातल्या निराश गोष्टी का ऐकतोय म्हणून. मग तो मला विचारेल आणि मी त्याला उत्तर देण्यासाठी हळू हळू पाण्यात जाईन. चेहऱ्यावर मंद हास्य ठेवून.

पाय, ढोपर, मांड्या, कंबर, छाती, हनुवटी, नाक, कान, डोळे, कपाळ, केस. मागे पुढे होण्याऱ्या लाटा. खारट  ओलावा आणि मनशांती.

जिथून आलो, तिथेच संपेन. तोही आणि मीही.

No comments:

Post a Comment